गोंडगावातील अल्पवयीन बालिकेची हत्या : नराधमाला गुन्हे शाखेकडून अटक


Murder of a minor girl in Gondgaon : Murderer arrested by Crime Branch भडगाव : भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील नऊ वर्षीय अल्पवयीन बालिकेची हत्या केल्याप्रकरणी स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (19, भडगाव तालुका) या आरोपीला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. भडगाव पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून व्हिसेरा प्रिझर्व्ह असल्याने ‘त्या’ अहवालानंतरच अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत.

गुन्हे शाखेकडून आरोपी ताब्यात
गोंडगाव गावातील नऊ वर्षीय अल्पवयीन मुलगी रविवार, 30 जून रोजी बेपत्ता झाल्यानंतर भडगाव पोलिसात नोंद करण्यात आली होती तर शोध सुरू असताना बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी एका खळ्यातील कडबा कुट्टीखाली आढळल्याने खळबळ उडाली होती. जळगाव गुन्हे शाखेने याप्रकरणी सखोल चौकशी करीत संशयित सोन्या विनोद पाटील यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने बालिकेच्या डोक्यात दगड टाकून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. नराधमाने अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती असून शवविच्छेदन अहवालाअंती तसेच व्हिसेरा प्रीझर्व्ह असल्याने त्यानंतर आलेल्या अहवालातूनच बालिकेवर अत्याचाराबाबत स्पष्ट येईल व त्यानंतर या गुन्ह्यात अत्याचाराचे कलम वाढवण्यात येईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.







यांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा
जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौभे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, विजय पाटील, लक्ष्मण पाटील, प्रीतम पाटील, महेश महाजन, अनिल जाधव, अक्रम शेख, किशोर राठोड, ईश्वर पाटील, किरण चौधरी, हेमंत पाटील, हरीष परदेशी, महेश पाटील, रमेश जाधव, भारत पाटील, प्रमोद ठाकूर, दर्शन ढाकणे आदींनी हा गुन्हा उघडकीस आणला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !