जामनेर तालुक्यात वाहनांचा तिहेरी अपघात : दोघे ठार, दोन गंभीर जखमी


Triple accident of vehicles in Jamner taluk: Two killed, two seriously injured पहूर : जवळच्या असलेल्या पिंपळगाव गोलाईत, ता.जामनेर येथे तिहेरी वाहनांचा अपघात होवून त्यात दोघे जण ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. रात्री उशिरापर्यंत मयतांची नावे कळू शकली नव्हती.

विचीत्र अपघातात दोघे ठार
पिंपळगाव गोलाईत येथे राष्ट्रीय महामार्ग असलेल्या जामनेर-पहूर रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामुळे रस्ता बंद झाल्याने दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत होते. या अपघातात दोन जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून दोन गंभीर जखमी झाले आहेत. जखमी व मयतांना पहूर पोलिसांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोलिस उपनिरीक्षक एस.पी.बनसोड, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर ढाकरे, विनोद पाटील यांनी धाव घेऊन गावकर्‍यांच्या मदतीने घटनास्थळी मदतकार्य केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !