भाजीपाला खरेदी करताना महिलेच्या गळ्यातून धूम स्टाईल मंगलपोत लांबवली
Dhoom style Mangalpot extended from the woman’s neck while buying vegetables जळगाव : घरासमोर भाजीपाला खरेदी करताना चोरट्यांनी महिलेचा गळ्यातून मंगलपोत धूमस्टाईल लांबवल्याची घटना जळागवच्या जीवन नगरात शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घटना घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काही क्षणात लांबवली सोनपात
जीवन नगरात आशा ज्ञानेश्वर महाले (55) या आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास या कॉलनीतीलच इतर महिलांसोबत घरासमोर भाजीपाला खरेदी करीत होत्या. इतर महिला दुसर्या बाजूला होत्या, तर महाले या रस्त्याच्या बाजूने होत्या. त्यांना दोन जण दुचाकीवर येताना दिसले, त्यामुळे बाजूला व्हायला लागल्या त्याच वेळी दुचाकीस्वाराने त्यांना खाली लोटत त्यांच्या गळातील 85 हजार रुपये किंमतीची 17 ग्रॅम वजनाची सोनपोत ओढून घेतली.






या घअनेत महिला खाली कोसळली व माझी पोत चोरली, असे सांगू लागल्या. त्या वेळी इतर महिला व भाजीपाला विक्रेता मदतीसाठी तसेच चोरट्यांचा पाठलाग करण्यासाठी धावले मात्र तोपर्यंत दुचाकीस्वार पसार झाले. याप्रकरणी आशा महाले यांनी रामानंद नगर पोलिसात दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहेत.


