लग्न न केल्यास अ‍ॅसीड फेकण्याची धमकी : पाचोर्‍यातील तरुणाला बेड्या


Threat of throwing acid if not married : Pachora youth shackled पाचोरा : लग्न न केल्यास अ‍ॅसीड फेकण्याची धमकी अल्पवयीन मुलीला दिल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली.

पाचोरा शहरातील एका भागात 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास असून शिक्षणानिमित्त देशमुखवाडी परिसरातील विद्यालयात दररोज ये-जा करते. गेल्या दोन महिन्यांपासून संशयित आरोपी समीर सलीम पिंजारी (कुरबान नगर, माहेजी नाका, पाचोरा) हा तिला शाळेतून येता जाता त्रास देत होता तसेच तिच्या घराजवळदेखील येऊन त्रास देत होता शिवाय तू माझ्याशी लग्न कर, माझ्या सोबत चल, नाही तर मी अ‍ॅसीड टाकेल अशी धमकीदेखील देत होता. अल्पवयीन तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य त्याने केल्याने तरुणीने हिंमत दाखवून कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







संशयित तरुण समीर सलीम पिंजारी यास लागलीच 8 वाजेच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. तपास डीवायएसपी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !