पाचोरा शहरात वेगवेगळ्या घटनेत दोघांच्या आत्महत्या


Two suicides in different incidents in Pachora City पाचोरा : शहरात वेगवेगळ्या दोन घटनेत तरुणासह तरुणीने आत्महत्या केली. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

तरुणाची छताला गळफास घेत आत्महत्या
ललित राजाराम पाटील (21, रा.मानसिंगका नगर, पाचोरा) या तरुणाने रविवारी दुपारी त्याच्या घराजवळ असलेल्या साई मंदिरापाशी पंचायत समितीच्या क्वार्टरजवळ छताला गळफास लावून त्याने आत्महत्या केली. दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.







दुसर्‍या घटनेत तरुणीची आत्महत्या
दुसर्‍या घटनेत रविवारी दुपारी राजश्री वीरेंद्र पाटील (21, राजीव गांधी नगर, पाचोरा) हिनेदेखील राहत्या घरी कोणीही नसताना कुठल्यातरी नैराश्याखाली येत आत्महत्त्या केली. पाचोरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक योगेश गणगे, सुनील पाटील, विनोद बेलदार, संतोष राजपूत, राहुल शिंपी, योगेश पाटील, संदीप पाटील, संदीप भोई, समीर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलवण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !