पाळधीतील कासट ग्रुपच्या कंत्राटदराकडे धाडसी घरफोडी : दोन लाख 60 हजारांची रोकड लंपास


Daring burglary near Kast Group’s contractor in Paladhi : 2 lakh 60 thousand cash looted जळगाव : सरकारी कंत्राटदार अनिल कासट यांच्या पाळधीतील कासट ग्रुप कार्यालयातून चोरट्यांनी दोन लाख 60 हजारांची रोकड चोरी केल्याची धक्कादायक घटना 5 ते 6 दरम्यान घडल्याने खळबळ उडाली. दैनिक दिव्यमराठी प्रेसच्या मागील बाजूस सरकारी कंत्राटदार तथा वीटभट्टी मालक अनिल अशोक कासट यांचे कार्यालय आहे.

घरफोडीमुळे उडाली खळबळ
5 ऑगस्ट रोजी सायंकाळी कासट यांचे कार्यालय बंद झाल्यानंतर रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला व दुसर्‍या दिवशी सकाळी उघडकीस आला. या घटनेत अज्ञात आरोपीने कार्यालयाच्या खिडकीची ग्रील उचकटून ड्रावर मधील रोख दोन लाख 60 हजार रुपयांची लांबवली तर या घरफोडीत कार्यालयाच्या दरवाजाचेदेखील नुकसान झाले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार उमेश भालेराव करीत आहेत.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !