इलेक्ट्रीक बाईकची डीलरशिप देण्याच्या आमिषाने कासोद्यातील वकीलांना दहा लाखांचा गंडा


Lawyers in Kasoda extorted 10 lakhs for giving electric bike dealership कासोदा, ता.एरंडोल : इलेक्ट्रीक चार्जिंग बाईकची डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत कासोदा येथील वकिलाची तब्बल 10 लाख 80 हजार रुपयात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस स्थानकात नाशिकच्या पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
कासोदा येथील वकील वासुदेव वारे यांना दुचाकी वाहनांचे शोरुम टाकण्यासाठी चार्जिंगच्या 20 इलेक्ट्रीक दुचाकी आणि डिलरशिप मिळवून देण्यासाठी संजय दिनकर जिवरक आणि महेश संजय जिवरक (रा.शिरसगाव ता. निफाड, नाशिक) या पिता-पूत्रांनी संपर्क साधून आमिष दाखवले तसेच त्यांच्याकडून 10 लाख 80 हजार रुपये घेतले मात्र आजपावेतो त्यांना गाड्या अथवा डिलरशीप दिली नसल्याने फसवणूक झाल्याची खात्री होताच वकिलांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. तपास सहाय्यक निरीक्षक योगीता नारखेडे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !