अल्पवयीन तरुणीला पळवणार्‍यासह आश्रय देणार्‍या दोघांना बेड्या : एमआयडीसी पोलिसांची कारवाई


Minor girl abductor and two shelterers in handcuffs : MIDC police action जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी अल्पवयीन मुलीला पळवणार्‍या तरुणाच्या सुरतमधून मुसक्या आवळल्या आहेत शिवाय पळवून नेण्यासाठी सहाय्यक करणार्‍या तसेच उभयंतांना सुरमध्ये खोली उपलब्ध करून देणार्‍या संशयितालाही बेड्या ठोकल्या आहेत. विकास दौलत बारी (25) या तरुणासह सागर अनिल बारी (24, रा. लक्ष्मणनगर, नवागाव दिंडोली, सुरत) व गणेश अशोक अस्वार (22, रा.शिरसोली प्र.बो., ता. जळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

एमआयडीसी पोलिसात दाखल होता गुन्हा
जळगाव तालुक्यातील एका गावातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात संशयित विकास दौलत बारी याच्याविरुध्द 25 जुलै रोजी अपहरणाचा गुन्हा करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, हवालदार रतीलाल पवार हे करीत होते. त्यावेळी मिळालेल्या माहितीवरुन सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, हवालदार रतीलाल पवार, अर्चना गायकवाड यांच्या पथकाने सुरत येथे जावून विकास दौलत बारी व अल्पवयीन मुलीचा शोध घेवून मंगळवार, 8 ऑगस्ट रोजी रात्री ताब्यात घेतले. दोघांची विचारपूस केल्यानंतर त्यांना भाडेतत्वावर खोली घेवून देणारा व त्यांना सहाय्य करणारा सागर अनिल बारी यास ताब्यात घेतल्यानंतर त्यांना घेवून पथक जळगावात आले.







त्यानंतर सदर पीडिताचा जबाब नोंदविला असता अल्पवयीन मुलगी व विकास बारी यांना पळवून जाण्यास दुचाकीवरून पाचोरा येथे सोडणारा गणेश अशोक अस्वार असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यास गुन्ह्यात आरोपी केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली तसेच दुचाकी जप्त करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !