जळगावातील शिवकॉलनीतील वृद्धाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू
An old man from Shiv Colony in Jalgaon died after being hit by a train जळगाव : धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने शहरातील शिवकॉलनी परीसरातील या वृध्दाचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विनोद नामदेव वराडे (67, सिध्दीविनायक मंदीराजवळ, शिवकॉलनी, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
रेल्वेच्या धक्का लागल्याने मृत्यू
विनोद वराडे हे पत्नी व मुलीसह शिवकॉलनीतील सिध्दीविनायक मंदीराजवळ वास्तव्याला होते. गुरूवार, 10 ऑगस्ट रोजी घरात कुणाला काहीही न सांगता पहाटे पाच वाजता घराबाहेर पडले. खंडेराव नगरजवळील रेल्वे रूळावरील खंबा क्रमांक 417 जवळून जात असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हर्षल पाटील आणि अजय सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मयताच्या पश्चात पत्नी सुनिता तसेच सुरेखा आणि मनिषा या दोन मुली आहेत. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.








