यावलमध्ये तरुणाकडून वयोवृद्धेचा विनयभंग


यावल : शहरातील रएका तरुणाने वयोवृध्द महिलेचा विनयभंग केल्याची घटनी 24 रोजी घडली. या प्रकरणी तरुणाविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भवानी पेठ परीसरातील रहिवासी व संशयीत आरोपी गणेश अरुण कोळी याने घराजवळ राहणार्‍या 80 वर्षीय वृद्धेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. 24 रोजी रात्री 11 वाजता ही घटना घडली. वृद्धेच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन खुबचंद चव्हाण व मेहबुब इमाम तडवी करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !