जळगावात 31 रोजी ‘मानधन दो या जेल दो’ आंदोलन


अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या न्याय प्रश्‍नांसाठी आंदोलनाचा निर्धार

यावल- तालुक्यातील अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने नुकताच मेळावा पंचायत समितीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी शालिनी बेंडाले होत्या. उद्घाटन युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ.अमृत महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या अंगणवाडी कर्मचार्‍यांना गेल्या तीन महिन्यांपासून मानधन देण्यात आलेले नाही, मानधनाचा फरक देण्यात आलेला नाही त्याच प्रमाणे सीबीईची बिले मिळाली नाहीत, भाऊबीज मिळालेली नाही, जून महिन्यापासून खाऊची बिले नाहीत, टी.ए.बिले मिळाली नसल्याने न्याय मागण्यांसाठी जळगाव जिल्हा परीषदेसमोर युनियनच्या माध्यमातून ‘मानधन दो या जेल दो’ या मागणीसाठी आंदोलन केले जाणार आहे.

आंदोलनात सहभागाचे आवाहन
आंदोलनात जिल्ह्यातील बहुसंख्य कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. यावल तालुक्यातील सर्व अंगणवाडीच्या कर्मचार्‍यांनी 31 जानेवारी रोजी जळगाव येथे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात दुपारी 12 वाजता जमावे, असे आवाहन कॉ.अमृत महाजन यांनी केले आहे. यावेळी तालुक्यातील दहा गावंच्या अंगणवाडी सेविका प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी यावल तालुक्यासाठीची नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यात अध्यक्षपदी फरन बी. (मारुळ) तर उपाध्यक्षपदी सुशीला बाविस्कर तसेच सचिवपदी उषाबाई सपकाळे यांची निवड करण्यात आली. सहसचिव शालिनी बेंडाले, खजिनदार रीता शिरतुरे, सल्लागार सुरेखा पाटील, सदस्य सुरेखा तडवी, फतेमा जोहरा, सुलभा जंगले, शकुंतला पाटील व इतर पाच जागा रीक्त अशी 15 जणांची निवड करण्यात आली. मेळाव्यानंतर आईसीड एस प्रकल्पाधिकरी यांना कर्मचार्‍यांचे मागणी निवेदन देण्यात आले. ब्लॉक समन्वयक प्रशांत पाटील यांनी ते स्विकारले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !