भुसावळात महामार्ग विस्थापीतांना न्याय मिळण्यासाठी अर्धनग्न आंदोलन
भुसावळ- राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे विस्थापीत झालेल्यांना मिरगव्हाण शिवारात जागा मिळावी, वेल्हाळे येथील राखेमुळे विस्थापीत झालेल्यांना सीएसआर निधी मिळावा आदींसह प्रमुख मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चातर्फे प्रजासत्ताक दिनी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. अर्धनग्नावस्थेत शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमाला जाणार्या आंदोलकांना पोलिसांनी कार्यक्रमस्थळापूर्वीच रोखले.
लोकसंघर्षच्या आंदोलनाने खळबळ
दिनदयाळ नगरमधील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणामध्ये विस्थापीत झज्ञलेल्या नागरिकांना मिरगव्हाण शिवारात जागा मिळावी. भारत मील मधून 1966 मध्ये नगरपालिकेने आठवडे बाजाराकरीता विस्थपितांना दिनदयाळ नगरची उभारणी केली होती. यामुळे पूर्नवसीत झालेल्यांचे पून्हा पूर्नवसन न करता अतिरीक्त जागा नाहाटा महाविद्यालयाकडून घ्यावी तसेच पूर्नवसन झज्ञलेल्या घरांच्या जागेचा सातबारा मिळण्याची प्रक्रिया सुरूकरावी, महानिर्मितीच्या राखेमुळे बाधीत झालेल्या विल्हाळे परीसरात नदी, तलाव, जंगल, शेती प्रदूषीत झाली आहे. यावर महानिर्मितीने कायमस्वरुपी उपायोजना करून सामाजिक दायीत्व निधी अर्थात सीएसआरमधून कल्याणकारी कामे करावीत, विल्हाळे गावात राखेची विल्हेवाट करताना यांत्रिकीकरण थांबवून गोरगरिबांना रोजगार द्यावे, आदी मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाचे चंद्रकांत चौधरी, किरण मिस्तरी, श्रीराम पाटीलख् विलास चौधरी, मयुर मगर, पंकज शेळके, विजय पाटील, सतीश पाटील, राजकुमार ठाकूर आदींनी अर्धनग्न आंदोलन केले. विविध मागण्याचे निवेदन शासकिय ध्वजवंदन होणार्या कार्यक्रमस्थळी अधिकार्यांना देण्यात येणार होते, मात्र शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्यांनी आंदोलकांना कोरेनेशन क्लबजवळ रोखून धरले. विविध मागण्यांचे निवेदन पोलिसांच्या माध्यस्थीने प्रशासनापर्यंत पोचविण्यात आले आहे.



