भाजपासोबत समझोता न केल्याने शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप : माजी मंत्री अनिल देशमुख


Accused of recovery of Rs 100 crores due to non-settlement with BJP : Former minister Anil Deshmukh जळगाव : भाजपमध्ये येण्यासाठी ईडीचा धाक मलाही दाखवला, मलाही समजोता करण्यासाठी भाग पाडले मात्र मी जुमानलो नाही म्हणून माझ्यावर मुंबईतील कमिश्नरद्वारे शंभर कोटी रुपये महिन्याला वसुलीचा आरोप करण्यात आला असा दावा, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी जळगावातील सभेत केला. ते म्हणाले की, माझ्यामागे ईडी, सीबीआय लावली तसेच एजन्सीचा गैरवापर करण्यात आला मात्र प्रत्यक्ष प्रकरण कोर्टात गेल्यानंतर ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप झाल्याचे स्पष्ट झाले तर 14 महिने जेलमध्ये ठेवण्यात आले व चार्जशीट दाखल करताना एक कोटी 71 लाखांचे दाखल करण्यात आले, असेही देशमुख म्हणाले.

खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्रास
देशमुख म्हणाले की, माझ्या घरी ईडीने चौकशी करताना सहा वर्षांच्या मुलीलाही सोडण्यात आले नाही. मुलीला चॉकलेट दाखवून ईडीने चौकशी केली मात्र आम्ही डगमगलो नाही. आता 83 वर्षीय बापासोबत खांद्याला खांदा लावून लढायचे आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केला म्हणून आमदार खडसेंना त्रास दिला जात आहे. भोसरी प्रकरणाचा अभ्यास केला तर त्यात काहीच तथ्य नाही. खडसे यांच्या जावयाला 22 महिने जेलमध्ये डांबण्यात आले. एजन्सीचा गैरफायदा घेण्यात आला, असेही अनिल देशमुख म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !