भुसावळ ब्राह्मण संघातर्फे समाजातील शिक्षकांचा सत्कार
Bhusawal Brahmin Association felicitated the teachers of the community भुसावळ : ब्राह्मण संघाच्या शतक महोत्सवानिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध शाळा व महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करणार्या शिक्षकांचा सत्कार बुधवार, 6 सप्टेंबर रोजी ब्राह्मण संघात करण्यात आला. अध्यक्षस्थानी जे.एन.पुराणिक होते.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षांचे स्वागत व सत्कार ब्राह्मण संघाचे अध्यक्ष विजय जोशी आणि सहसचिव आमोद टेंभुर्णीकर यांनी केला. ब्राह्मण संघाचे अध्यक्ष विजय जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर समाजातील शिक्षक श्रीकृष्ण टेंभुर्णीकर, मनोज कुळकर्णी, आनंद पाठक, चिपळूणकर, राजू कुळकर्णी, सागर कुळकर्णी, मानसी कुळकर्णी, प्रकाश जोशी, भूषण भंडारी, सुनील पाठक, सोनाली मुजूमदार, डॉ.रमेश जोशी या सर्वांचा शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंत पुराणिक यांनी मनोगत व्यक्त करतांना त्यांचे शिष्य असलेल्या व आज ज्ञानदान करीत असलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्याचा योग जुळून आल्याचे आपले भाग्य असल्याचे सांगितले. सूत्रसंचलन पंकज जोशी यांनी केले. यशस्वीतेसाठी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष विजय जोशी, सहसचिव आमोद टेंभूर्णीकर, कोषाध्यक्ष प्रसन्न गंधे, अंतर्गत हिशोब तपासणीस शंतनु गचके व कार्यकरीणी सदस्य गजानन जोशी, संजय बोचरे यांनी परीश्रम घेतले.
