अवैध गौण खनिज माफियांची पुन्हा दादागिरी : बोदवडच्या कोतवालाला मारहाण करीत वाहन पळवले ; दोघांविरोधात गुन्हा


Illegal subsidiary mineral mafia again bully : Kotwala of Bodwad was beaten and the vehicle was driven away ; Crime against both बोदवड : अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतल्याच्या रागातून शेलवड सजाचे कोतवाल यांना मारहाण करण्यात आली व त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर पळवण्यात आल्याची घटना बोदवड शहरातील महात्मा फुले चौकात मंगळवार, 12 रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. याप्रकरणी बोदवड पोलिसात दीपक तुळशिराम सपकाळ (बोदवड) व जंगलू मांगो मोरे (बोदवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाण करीत लांबवले ट्रॅक्टर
मंगळवारी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेच्या दरम्यान शहरातील महात्मा फुले चौकात कोतवाल गजानन सुरेश अहिरे (33) यांनी अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर (एम.एच.19 ई.ए.4249) अडवल्यानंतर संशयिताना राग आला व ल्यांनी धमकी देत मारहाण करीत शासकीय कामात अडथळा आणला तसेच ताब्यात जप्त केलेले ट्रॅक्टर पळवले तसेच कोतवाल गजानन अहिरे हे तहसीलदार यांच्यासोबत मंगळवारी दुपारी गौण खनिज कारवाई करण्याकरता जात असताना बोदवड-जामनेर रोडवर जुने तहसील कार्यालयाजवळ गणेश झेरॉक् समोर एक विना नंबरचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मुरुमाने भरलेला दिसून आल्यानंतर हे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आले मात्र नंतर हे ट्रॅक्टरही पळवून नेण्यात आले.







शासकीय कामात अडथळा आणून धमकी दिल्याप्रकरणी तसेच 12 लाख तीस हजारांचे ट्रॅक्टर चोरून व विनापरवानगी घेऊन गेल्याप्रकरणी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत. दरम्यान, कोतवाल यांना मारहाण केल्याप्रकरणी सर्व महसूल कर्मचार्‍यांनी लेखनी बंद आंदोलन करीत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !