हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
वर्धा : एका महाविद्यालयात तासिका तत्वावर शिकवण्याचे काम करणार्या शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये घडल्याने राज्यात खळबळ उडाली. जखमी तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असून विक्की नगराळे (27 वर्ष) या नराधमाने हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त आहे. पीडित तरुणी सोमवारी सकाळी कॉलेजमध्ये जात असताना नंदोरी चौकापासून काही अंतरावर दुचाकीवर आलेल्या युवकाने तिच्या अंगावर पेट्रोल फेकलं. आणि त्याचा हातात पेटवलेला टेंबा फेकून तिला पेटवून दिलं. त्यानंतर लगेचच त्याने घटनास्थळवरुन पळ काढला. युवतीने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिच्या अंगावर पाणी टाकून तिचे प्राण वाचवले. त्यानंतर जवळीत उपजिल्हा रुग्णालयात तिच्यावर प्रथमोपचार करकण्यात आले आणि नंतर तिला नागपूरच्या रुग्णालयात दाखल केलं.


