चाळीसगावातील गुन्हेगारांची टोळी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार


Gang of criminals from Chalisgaon banished from the district for two years जळगाव : चाळीसगाव शहरातील गुन्हेगारांच्या टोळीला जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबतचे आदेश शनिवार, 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता काढण्यात आले. गुन्हेगारांची चाकडी जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात एकत्र टोळी करून चोरी व लूटमार करीत असल्याने संशयीतांच्या टोळीला हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

संशयितांविरोधात तब्बल 18 गुन्हे
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी भूपेश उर्फ भुर्‍या यशवंत सोनवणे (23, आर.के. लॉन्सजवळ चाळीसगाव), अभय उर्फ अभ्या हिंमत लोहार (19, प्लॉट एरीया चाळीसगाव), धनंजय उर्फ धन्या बाळासाहेब भोसले (25, स्वामी समर्थ नगर, चाळीसगाव) आणि चोंग्या उर्फ तुषार महेंद्र जाधव (26, नारायणवाडी पेट्रोल पंपाजवळ, चाळीसगाव) यांच्या टोळीविरोधात तब्बल 18 गंभीर प्रकारचे गुन्हे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असल्याने त्यांना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर केला होता.







यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक विनोद भोई, तुकाराम चव्हाण, सत्तार सिंग माहेर, महिला पोलीस कॉन्स्टेबल शबा शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार युनोसेक इब्राहिम पोलीस कॉन्स्टेबल सुनील पंडित दामोदर यांनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !