महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : नबाम रेबिया केसचा पुर्नविचार करण्यास सुप्रीम कोर्ट राजी : उद्या महत्त्वपूर्ण सुनावणी
Power struggle in Maharashtra : Supreme Court agrees to reconsider Nabam Rebia case : Important hearing tomorrow मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच आता नबाम रेबिया केसचा पुर्नविचार करण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे. गुरुवार, 12 रोजी सात न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर या प्रकरणाला सुरुवात होणार आहे.
पुन्हा एका होणार सुनावणी
शिवसेनेतील दोन्ही गटातील फुटीनंतर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. या केसवेळी नबाम रेबिया या प्रकरणाचा संदर्भ देण्यात आला होता. आता या नबाम रेबिया याच प्रकरणाची सुप्रीम कोर्ट पुन्हा एकदा सुनावणी घेणार आहे.




‘रेबिया प्रकरण महाराष्ट्राला लागू होत नाही’
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी घेत असताना रेबिया प्रकरण महाराष्ट्राला लागू होत नसल्याचे सरन्यायाधीशांनी मत मांडले होते. सुप्रीम कोर्टाच्या निकालानं विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात काही बाधा निर्माण झालीय याच मुद्यावरून नबाम रेबिया प्रकरणाचा उल्लेख या प्रकरणात होऊ शकतो. महाराष्ट्राच्या प्रकरणात अध्यक्षांच्या अधिकारावर गदा आलेली नाही.
अध्यक्षांनी स्वत: स्वत:साठी काही अडचणी निर्माण केल्या. अपात्रतेच्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी दोन दिवसांची मुदत सदस्यांना दिली होती. मग हे सदस्य कोर्टात आले आणि कोर्टाने 12 जुलैपर्यंत नोटिसीला उत्तर देण्याची मुदत वाढवली आणि याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता. बहुमत चाचणीला सामोरे न जाता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळले असं कोर्टाने म्हटलं असं कोर्टाने म्हटले होते.