खाण्यात विष देत एकाच कुटूंबातील पाच जणांची केली हत्या


Five members of the same family were killed by poisoning their food गडचिरोली : सासरच्या मंडळींकडून मारण्यात येणारे टोमणे व जमिनीतील वादाला कंटाळून घरातील सुनेने कुटूंबातील पाच जणांची खाण्यात विष घालून हत्या केली. एका पाठोपाठ एक अशा पाच जणांच्या झालेल्या हत्येनंतर पोलिस प्रशासन चक्रावले होते मात्र तपासात सुनच आरोपी निघाल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. गडचिरोली जिल्ह्यातील महागाव येथे घडली आहे.

एका पाठोपाठ एक पाच जणांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांत अहेरी तालुक्यातील महागाव येथील शंकर पीरू कुंभारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाच जणांचा अचानक आजारी पडून मृत्यू झाला. अवघ्या वीस दिवसांत घरातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.





वादाला कंटाळून केली हत्या
पोलिसांनी तपास केल्यानंतर घरात सातत्याने होत असलेला जमिनीवरून वाद तसेच सासरकडील लोकांकडून मिळत असलेल्या टोमण्यांमुळे सुनेने अन्य एका महिलेच्या मदतीने घरातील सर्वांना विष देऊन संपविल्याची बाब समोर आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !