वडिलांच्या जपल्या स्मृती : सारीच्या राखेत लावले आंब्याचे झाड

नागद येथील शिक्षक विनोद परदेशी यांनी राबविला उपक्रम ः आंब्यांचा गोडवा मिळणार पुढील पिढीला


अशोक परदेशी

भडगाव : भडगाव तालुक्यातील वाडे येथून जवळच असलेल्या बहाळ, ता.चाळीसगाव येथील जावई व नागद येथील शिवसेना विभाग प्रमुख गोपालसिंग राजपुत यांचे नुकतेच दुखद निधन झाले. परदेशी, राजपूत समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश कोंडु परदेशी यांनी केलेल्या आव्हानानुसार सारिच्या दिवशी मुलगा विनोद परदेशी यांच्यासह कुटुंबाने पोतडीभर काढलेल्या सारीच्या राखेत माती मिक्स करुन खड्डे खोदुन आंब्याचे झाड वडीलांच्या नावाची कायम आठवण रहावी, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, आंब्याच्या सावलीसह गोडवा मिळावा, वडीलांचे नाव अजरामर रहावे या संकल्पनेतून विनोद परदेशी यांच्या कुटुंबाने आंब्याचे झाड लावले आहे. वडीलांची खारी व मातीत लावले आंब्याचे झाड, आठवण राहील वडीलांच्या नावाची. आंब्याचा गोडवा राहील कुटुंबाला. नागद येथील शिक्षक विनोद परदेशी यांनी राबविला उपक्रम. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वस्तरातुन कौतुक होतांना दिसत आहे.


आंब्यांचा गोडवा मिळणार पुढील पिढीला
आपल्या आई, वडीलांनी आपल्यासाठी शेती, संपत्ती, पैसा कष्टाने जमवुन ठेवलेला असतो. त्यांच्यावरच आपण आयुष्यभर सुखाने जीवन जगतो. माञ आई किंवा वडील, बाबा, आजी यांचा मृत्यु झाल्यावर कालांतराने आपल्याला त्यांची आठवण पडते. असे पाहण्यात येते. मग ज्या आई, वडीलांनी, बाबा, आजींनी आपल्यासाठी जे केलेले आहे. याचे सार्थक ठरावे किंवा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी. त्यांचे नाव पिढयाअन पिढया आजरामर राहावे. म्हणुन आपल्या आई, वडील, बाबा, आजी यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले.आपल्या सुखासाठी अहोराञ कष्ट केले. त्यांच्यासाठी त्यांचे निधन झाल्यावर त्यांची पोतडीभर सारी सरकटतांना राख काढावी. आणि आपल्या शेतात योग्य जागेवर खड्डा खोदुन राख व माती मिश्रण करून आंब्याचे झाड लावावे.हे आंब्याचे झाड वडील, आई, बाबा, आजी आदींच्या नावाने ओळख व आठवण देत राहील. झाडाची सावली मिळेल.

आंब्याची चव चाखण्याचा गोडवा मिळेल. उत्पन्नही मिळेल. परदेशी राजपुत समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश कोंडु परदेशी यांनी भडगाव तालुक्यातील भट्टगाव, नागद , वाडे यासह काही इतर गावांंना अंत्ययाञेवेळी उपस्थित नातेवाईक, नागरीकांना अशी संकल्पना करुन आंब्याचे झाड लावण्याचे आवाहन केले होते. या संकल्पनेची दखल नागद येथील विनोद गोपालसिंग परदेशी या कुटुंबाला केली होती. या संकल्पनेची दखल घेत कन्नड शिवसेना विभाग प्रमुख गोपालसिंग राजपुत यांचे निधन झाल्यानंतर सारीच्या दिवशी त्यांचे नावाने शेतात या परदेशी, राजपुत कुटुंबाने शेतात आंब्याचे झाड लावलेले आहे.

शिवसेना विभाग प्रमुख गोपालसिंग राजपूत यांचे निधन झाल्यानंतर, सारीच्या दिवशी परदेशी राजपूत समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कोंडु परदेशी यांनी समाजापुढे एक अभिनव कल्पना मांडली. की यापुढे आपल्या समाजातील किंवा आपले आई,वडील यांचे निधन झाल्यानंतर राखेचा काही भाग काढून तो आपल्या शेतात एक खड्डा करून त्यात टाकावा व त्या ठिकाणी एक नामांकीत गावरान आंब्याचे फळ झाड लावावे. जेणेकरून ते झाड जेव्हाही आपल्या डोळ्यासमोर येता-जाता दिसेल तेव्हा आपल्याला आपले वडील किंवा आईची आठवण कायम येत राहील. म्हणजेच ज्या पद्धतीने आपले आई वडील आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करून आपले जीवन सुखी बनवतात. त्याच पद्धतीने ते आब्याचे फळझाड आपल्याला आयुष्यभर फळ देत राहील व आपले आई-वडील त्या झाडाच्या रूपाने आपल्या नजरेसमोर कायम राहतील आणि त्यांच्या आठवणींचा सुगंध बर्याच पीढीना बाबांची आईची आब्याच्या रूपान आपल्या आयुष्यभर आपल्या जीवनात दरवळत. राहील .याच त्यांच्या अभिनव कल्पनेला दाद देत विनोदसिंग परदेशी, शितल परदेशी यांनी आपल्या शेतात एक आंबा या वृक्षाचे रोप लावून आपल्या वडिलांना आयुष्यभर अमर केले. याप्रसंगी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कोंडु परदेशी, संदीप परदेशी, मनीषा परदेशी, दिनेश परदेशी, अनिता परदेशी हे उपस्थित होते. या अभिनव कल्पनेचे समाजातून कौतुक होत आहे.

आई व वडीलांनी कष्ट करुन संपत्ती जमविलेली आहे. आपल्या लहानाचे मोठे केले. त्यांच्या नावाला कायमस्वरुपी आठवणींना उजाळा मिळावा. अंत्ययाञेवेळी नागद, भट्टगाव, वाडे यासह इतर गावांना सारीच्या दिवशी पोतडीभर सारीची राख काढावी. नंतर शेतात खड्डे खोदुन सारीची राख व माती मिश्र करुन आंब्याचे झाड लावावे. या झाडामुळे वडील, आई,बाबा, आजींची आठवण राहील.झाडाची सावली मिळेल. आंब्याच्या गोडव्यासह उत्पन्नही मिळेल. या केलेल्या आव्हानाची विनोदसिंग परदेशी यांच्या कुटुंबाने दखल घेत शेतात आंब्याचे झाड लावलेले आहे. या उपक्रमाची समाजासह इतर समाजबांधवांनीही अंमलबजावणी करावी अशी आशा आहे.

सुरेश कोंडु परदेशी.
परदेशी, राजपुत समाज जिल्हाध्यक्ष जळगाव




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !