यावलच्या साने गुरुजी विद्यालयाच्या शिक्षण समिती अध्यक्षपदी नगराध्यक्षा छाया पाटील यांची निवड


Nagaradhyaksha Chhaya Patil elected as Chairperson of the Education Committee of Sane Guruji Vidyalaya, Yawal यावल (20 एप्रिल 2026) : यावल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांची नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल साने गुरुजी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांच्या वतीने छाया पाटील यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पाटील यांनी विद्यालयाच्या

निवडीचे यावलला स्वागत
कामकाजाचा व विविध अडीअडचणी संदर्भातील आढावा घेतला.
यावल नगर परिषद संचलित यावल येथे साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आहे. या शाळेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवड नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली. यात अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांची बहुमताने निवड करण्यात आली.


या समितीचे पदसिद्ध सचिव तथा शाळेचे मुख्याध्यापक एम.के.पाटील तसेच शाळेचे उपप्राचार्य ए.एस.इंगळे, पर्यवेक्षक विलास काटकर, नितीन बारी, डी.एस.फेगडेे, पी.एन.सोनवणे, अनिल सोनवणेसह आदींनी नगराध्यक्ष पाटील यांची शिक्षण समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समितीत त्यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे या प्रसंगी पाटील यांनी शाळेच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला व शाळेच्या अडी-अडचणी समस्या जाणून घेतल्या, कशा पद्धतीने आगामी काळात शाळेच्या विविध समस्या नगर परिषदेच्या माध्यमातून सोडवता येतील याबाबत त्यांनी मुख्याध्यापक सह समिती सोबत ही चर्चा केली.

शाळेचे गेट बदलणार
साने गुरुजी विद्यालयाचे निर्मनुष्य भागातून मागे असलेले हे गेट बदलण्यात यावी अशी मागणी पालक वर्गासह आदींच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीबाबत नगरपालिकेकडे देखील पाठपुरावा करण्यात आला होता. या प्रसंगी नगराध्यक्ष छाया पाटील, नगरसेवक अतुल पाटील यांनी शाळेचे गेट हे समोरच्या भागात करणार असल्याचे सांगितले आहे. लवकरच या संदर्भात निर्णय होईल आणि गेट समोरच्या भागात उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !