नाशिकमधील लैंगिक शोषण प्रकरण : टीसीएस कर्मचारी निदा खानला कंपनीने दाखवला घरचा रस्ता
Nashik Sexual Harassment Case : TCS Employee Nida Khan Shown the Door by the Company नाशिक (20 एप्रिल 2026) : राज्यात गाजत असलेल्या नाशिकमच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणातील संशयीत निदा खानला टीसीएस घरचा रस्ता दाखवत तिचे निलंबन केले आहे. कंपनीने गत 9 एप्रिल रोजीच तिच्यावर ही कारवाई केली असलीतरी सोमवारी हा बाब स्पष्ट झाली आहे. दरम्यान, निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी 27 तारखेपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली.
पत्राद्वारे जाहीर केले निलंबन
टीसीएसने गत 9 एप्रिल रोजी जारी केलेल्या एका अधिकृत पत्राद्वारे निदा खानला निलंबित केले आहे. ‘आज तक’च्या वृत्तानुसार, कंपनीने म्हटले आहे की, निदा खानशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. त्या सध्या न्यायालयीन किंवा पोलीस कोठडीत आहेत. या परिस्थितीमुळे त्या आपल्या व्यावसायिक जबाबदार्या पार पाडण्यास असमर्थ आहेत. याच आधारावर त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

निलंबन आदेशात हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, निदा खान या 27 डिसेंबर 2021 पासून कंपनीशी संलग्न होत्या. त्या ’प्रोसेस असोसिएट’ या पदावर कार्यरत होत्या. कंपनीने त्यांचा नेटवर्क अॅक्सेसही तत्काळ प्रभावाने रद्द केला आहे. याव्यतिरिक्त, सध्या त्यांच्या ताब्यात असलेल्या कंपनीच्या सर्व मालमत्ता परत करण्याच्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना कोणत्याही कार्यालयात उपस्थित राहण्यास अथवा घरून काम करण्यासही मनाई करण्यात आली आहे.


