भुसावळात जिल्हाधिकार्‍यांनी केले तापी सभागृहाचे उद्घाटन

तहसील आवारातील डंपरसह ट्रकचा लिलाव करण्याच्या सूचना


District Collector inaugurated Tapi Hall in Bhusawal भुसावळ : शहरातील प्रांताधिकारी कार्यालयात तापी सभागृहाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याहस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. विविध प्रशासकीय बैठका घेण्यासाठी या सभागृहाचा आता उपयोग होणार आहे. यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, तहसीलदार निता लबडे व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ईव्हीएम गोदामाची केली पहाणी
जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी तहसील आवारातील गोदामात असलेल्या ईव्हीएमची पाहणी केली. तहसील कार्यालयाच्या आवारात भंगारस्थितीत उभे असलेले डंपर, ट्रक व जप्त केलेल्या वाळूचा लिलाव करून तातडीने ही रक्कम शासन तिजोरीत जमा करण्याची सूचना आयुष प्रसाद यांनी केली. निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, प्रांताधिकारी जितेद्र पाटील, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, तहसीलदार निता लबडे, निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर आदी उपस्थित होते. दरम्यान, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी शहर पोलिस ठाण्याला भेट देत अद्यावत रेकॉर्डरूमची पाहणी करीत समाधान व्यक्त केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !