भुसावळातील स्थलांतरीतांसह मृतांची साडेसहा हजार नावे होणार कमी
प्रांताधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांची बैठक : आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाकडून कामांना गती
Six and a half thousand names of dead including migrants from Bhusawal will be reduced भुसावळ : विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये नव मतदारांची नोंदणी करण्यासह मृत व्यक्तींची नाव वगळणी करणे, महिला मतदार नोंदणी करणे आदी कामांना गती स्थानिक प्रशासनाने गती दिली आहे. सहा हजार 500 स्थलांतरीत, मृत मतदारांची नावे वगळली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर नावे नोंदणी करण्यासाठी राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांची बैठक बुधवारी प्रांत कार्यालयात झाली. यासाठी सर्व राजकीय पक्षाकडून बुथ लेव्हल एजंटांनी तत्काळ नाव नोंदणीची माहिती द्यावी, असे आवाहन प्रांत जितेंद्र पाटील यांनी केले आहे.
राजकीय पक्षांची बैठक
प्रांत कार्यालयात बुधवारी शहरातील राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर यांनी केले. यावेळी त्यांनी बैठकीत सांगितले की, मतदार यादीत नवीन मतदारांची नाव नोंदणी सुरू आहे. त्यासाठी राजकीय पक्षाकडून बुथ लेव्हल एजंट यांनी तत्काळ त्याच्या प्रभागातील नवीन मतदारांची नावे निवडणूक शाखेकडे आणून द्यावीत, जेणे करून ते अर्ज ऑनलाईन वेबसाईटवर भरून मतदार यादीत समाविष्ट केली जातील. भुसावळ तालुक्यातील स्थलांतरीत व मृत मतदारांची 12 हजार 526 मतदारांची नावे कमी केली जाणार आहे. हल्ली 6 हजार 500 नावे पहिल्या टप्यात कमी केली जात आहे. जानेवारीपर्यंत 12 हजार 526 मतदारांची नावे वगळली जाणार आहेत.


यांची बैठकीला उपस्थिती
माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी सांगितले की, निवडणूक यंत्रणेने खात्री करूनच मतदार यादीतील मृत, स्थलांतरीत मतदारांची नावे कमी करावीत. बैठकीला प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, काँग्रेस शहराध्यक्ष रवींद्र निकम, प्रदेश उपाध्यक्ष मो.मुन्वर खान, शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे, दिलीप सुरवाडे, मुजाहिद शेख, पिंटू भोई, राहुल सोनार, भास्कर मराठे, शाहरूख खान विजर खान, परीक्षीत बर्हाटे, निलेश महाजन, विनायक वासनिक आदी उपस्थित होते.







