शिवजयंती निमित्ताने भुसावळात 10 रोजी वकृत्व स्पर्धा
अंतर्नाद प्रतिष्ठान आणि पंचायत समिती शिक्षण विभाग करणार आयोजन
भुसावळ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत या हेतुने अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी यांच्यासाठी शहरस्तरीय आणि शिक्षकांसाठी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा 10 फेब्रुवारी रोजी होत आहे. वक्तृत्व स्पर्धा तीन गटात होणार असून प्रत्येक गटातील तीन विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येईल. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देउन प्रोत्साहन दिले जाणार आहे.
विविध गटात स्पर्धा होणार
पहिला गट तिसरी ते चौथीसाठी असून जिजाऊंचा शिवबा, छत्रपती शिवरायांचे बालपण, शिवराज्याभिषेक वेळ तीन मिनिटे, दुसरा गट पाचवी ते सातवीसाठी असून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे स्वामिनिष्ठ मावळे, छत्रपती शिवाजी महाराजांची गुणवैशिष्ट्ये, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज वेळ चार मिनिटे, तिसरा गट आठवी ते दहावीसाठी असुन उत्तम प्रशासक छत्रपती शिवाजी महाराज, गडकोट किल्ले व छत्रपती शिवाजी महाराज, मी छत्रपती शिवाजी महाराज भोसले बोलतोय वेळ पाच मिनिटे हे विषय वकृत्वासाठी असणार आहे. यंदा पहिल्यांदाच तालुक्यातील शिक्षकांसाठीही स्पर्धा असुन चौथ्या गटासाठी बाल शिवाजी घडविण्यात आजच्या शिक्षकाची भूमिका, 21 व्या शतकात शिवाजी महाराज अवतरले तर…., जिजाऊंचे बाळकडू आधुनिक काळाची गरज, शिवराय नक्की कोणाचे?, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे विषय असणार आहे आणि वेळ सात मिनिटे असणार आहे. या संदर्भात नियोजन बैठक झाली. संजय भटकर, श्रीकांत जोशी, नाना पाटील, अमितकुमार पाटील, देव सरकटे, पंकज पाटील, आर.धनगर, आर.कापडणे, विक्रांत चौधरी, श्याम दुसाने, योगेश इंगळे, परेश सपकाळे आदी उपस्थित होते.

10 रोजी होणार स्पर्धा
स्पर्धा सोमवार, 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वाजता भुसावळ येथील म्युन्सीपल हायस्कूलमधे होणार आहे. स्पर्धकांनी अधिक माहिती साठी प्रकल्प प्रमुख जीवन महाजन 7588815384, प्रकल्प समन्वयक हेमांगीनी चौधरी 9373111845, सह समन्वयक समाधान जाधव 9022464981, शैलेंद्र महाजन, प्रदीप सोनवणे, अमित चौधरी यांच्याशी संपर्क साधावा.स्पर्धेत जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे.


