भुसावळातील सेंट्रल रेल्वे स्कूलमध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप


भुसावळ : रेल्वे स्कूलमध्ये शनिवारी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ झाला. वरीष्ठ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मेहनत करून अभ्यास करावा मात्रद्ध परीक्षेची भीती बाळगू नये आणि ठरावीक व्यावसायीक क्षेत्राचा विचार न करता विविध संधी आज उपलब्ध आहेत त्याचा विचार करून जीवनात यशस्वी व्हावे, असा मोलाचा सल्ला दिला. शैक्षणिक समुपदेशक सुमित्रा गांगुर्डे यांनीदेखील मार्गदर्शन केले. प्राचार्य सतीश कुलकर्णी, दहावी-बारावीचे वर्ग शिक्षक स्वाती चतुर्वेदी, सुकांत मिश्रा, किर्ती काळे यांनी मार्गदर्शन केले. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांमधून तनिष्का साळवे, अरीहंत तिरपुडे, साक्षी पाटील, चंचल मिसाळ यांनी मनोगतात आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने उतत्तंग भरारी घ्यावी, असा आशावाद मनोगतात व्यक्त केला. मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक वितरणाचा कार्यक्रम तसेच रसायनशास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनासाठी विद्यालयाच्या शिक्षिका मंगला भालेराव आणि आरती रामटेके यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन ग्रंथपाल संतोष उपाध्याय यांनी केले. यशस्वीतेसाठी प्राचार्य सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी यांनी परीश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !