पारोळ्यानजीक भीषण अपघात : तिघे ठार 18 जण जखमी
Terrible accident near Paroli: Three killed and 18 injured पारोळा शहराजवळील विचखेडा फाट्याजवळ झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात तिघे महिला ठार झाल्या तर 18 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
विचित्र अपघातात तिघे ठार
पारोळा तालुक्यातील विचखेडा फाट्याजवळ वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक, जीप आणि पिकअप वाहनात धडक झाली. या अपघातात रेखाबाई गणेश कोळी (55), योगीता रवींद्र पाटील (40, दोन्ही रा.बोळ,े ता.पारोळा) व चंदनबाई गिरासे (65) अशी मयतांची नावे आहेत.


कंटेनरच्या धडकेने अपघात
पारोळा तालुक्यातील बोळे येथून ग्रामस्थ चिलाणे, ता.शिंदखेडा येथे एका अंत्यसंस्कारसाठी बोलेरो वाहन क्रमांक (एम.एच.18 एम.5554) ने जात असताना दुपारी 12 वाजेच्या सुमारास लोखंडी रोल वाहून नेत असलेला कंटेनर क्रमांक (जी.जे.12 बी.डब्ल्यू.7254) चा ताबा सुटल्याने भरधाव वाहनाने पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण आपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 18 जण गंभीर जखमी झाले आहे. यातील तिघांना धुळे तर इतरांना प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच बोळे परीसरातून शेकडो ग्रामस्थांनी अपघातस्थळी तसेच कुटीर रुग्णालयात धाव घेतली.
अपघात हे ग्रामस्थ झाले जखमी
रणजीत सुरसिंग गिरासे (60), भरत रामभाऊ गिरासे (65), राजेशभाई कोळी (45), भीमकोर सत्तरसिंग गिरासे (50), भुराबाई मोहनसिंग गिरासे (40), भुराबाई तात्या गिरासे (40), रेखाबाई अधिकार गिरासे (50), नानाभाऊ सुभाष गिरासे (55), भटाबाई साहेबराव गिरासे (45), सुनीता गिरासे (44), भुराबाई भीमसिंग गिरासे, अजतसिंग दादाभाऊ गिरासे (50), सय्यद लियाकत (21, रा.मालेगाव), हिराबाई विजयसिंह गिरासे (40), भीमकोरबाई जगत गिरासे (60), भगवानसिंग नवलसिंग गिरासे (65), रंजनसिंग भारतसिंग गिरासे (55), रुपसिंग नवलसिंग गिरासे (60), दयाबाई रूपसिंग गिरासे (55), राजेबाई साहेबराव कोळी (45) अशी जखमी महिलांची नावे आहेत.
