कुरंगीतील नवरदेवाचा बोहल्यावर चढण्यापूर्वीच मृत्यू


पाचोरा : गिरणा नदीत बुडाल्याने बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कुरंगी गावात घडली. रमेश झगा पाटील (27) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवार, 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.45 वाजेच्या सुमारास गिरणा नदीवर दोघा बहिणींसह रमेश हा झावरी धुण्यासाठी आला असता अचानक पाय सरकल्याने नदीच्या वाहत्या पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला.

लग्नापूर्वीच गाठले मृत्यू
मयत रमेशचा 18 फेब्रुवारी रोजी पदमालय देवस्थानावर पुण्याच्या वधूशी विवाह होणार होता मात्र त्याचा अचाकन झालेल्या मृत्यू परीसरात शोककळा पसरली. मृताच्या पश्‍चात आई, दोन बहिणींसह दोन भाउ आहेत. अंत्यत प्रतिकुल परीस्थितीत त्यांचे कुटुंब उदरनिर्वाह करीत आहे त्यामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे शासनाने त्वरीत नैसर्गिक आपत्तीतुन मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !