मुंबई-नागपूर, नाशिकरोड-नागपूरसाठी पाच सुपरफास्ट विशेेष गाड्या


भुसावळ :  रेल्वे गाड्यांना वाढलेली प्रवाशांची गर्दी पाहता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई-नागपूर आणि नासिक रोड-नागपुर दरम्यान पाच सुपरफास्ट विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेतील नाशिकरोड-नागपूर व मुंबई नागपूर या दोन मार्गावर पाच विशेष गाड्या चालविल्या जातील. यात 02031 व 02032 मुंबई – नागपूर सुपरफास्ट विशेष गाडीच्या दोन फेर्‍या होणार आहे. डाऊन (02031) सुपरफास्ट विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ही गाडी 15 फेब्रुवारी आणि 18 फेब्रुवारी या दिवशी रात्री 12.20 वाजता सुटेल तर त्याच दिवशी दुपारी 2.10 वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे. या गाडीच्या दोन फेर्‍या होतील तसेच गाडी (02032) अप सुपरफास्ट विशेष गाडी नागपूर येथून 16 फेब्रुवारीला दुपारी 3.30 वाजता सुटेल, दुसर्‍या दिवशी पहाटे 6.15 वाजता ही गाडी मुंबईत पोचेल, या गाडीची फक्त एकच फेरी होणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नासिक रोड, भुसावळ, मलकापुर, शेगाव, अकोला, मुर्तिजापुर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीला 15 आरक्षित डबे असतील तर दोन जनरल असतील.

नाशिकरोड-नागपूरसाठी एक फेरी
नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून नागपूरसाठी विशेष गाडी चालविली जाणार आहे. या गाडीची एक फेरी होणार आहे. डाऊन (02033) ही गाडी नाशिकरोड येथून 16 फेब्रुवारीला पहाटे 4.30 वाजता सुटेल ही गाडी त्याच दिवशी दुपारी 2.10 वाजता नागपूरला पोहोचेल. अप (02034) ही सुपरफास्ट गाडी नागपूर येथून शनिवार, 15 रोजी दुपारी चारला सुटेल ही गाडी दुसर्‍या दिवशी पहाटे चारला नाशिकरोडला पाहोेचेल. ही गाडी मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीला दोन जनरल तर 15 आरक्षित डबे जोडलेले असतील. विशेष शुल्कासह या गाडीचे आरक्षणाला गुरूवार, 13 पासून सुरूवात होणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !