भुसावळ भाजपा उद्योग आघाडी शहराध्यक्षपदी पराग भोळे
Bhusawal BJP Udyog Aghadi City President Parag Bhole भुसावळ : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बैठकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे व भाजपा जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या आदेशानुसार भुसावळ भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी यांनी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या भुसावळ शहराध्यक्षपदी पराग भोळे यांची नियुक्ती केली.
आमदारांच्या हस्ते मिळाले नियुक्तीपत्र
भुसावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते भोळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. विधानसभा निवडणूक प्रमुख संजय पाटील, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, उपाध्यक्ष सतीश सपकाळे, भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या काळात पक्ष विस्तारासाठी अधिक जोमाने काम करणार असल्याचे तसेच भुसावळ शहर व एमआयडीसीमधील उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न करणाऱ असल्याची ग्वाही पराग भोळे यांनी दिली.







