भुसावळात लिकेज पाईप लाईनची आज होणार चाचणी


Leakage pipe line will be tested in Bhusawal today भुसावळ : शहरातील दक्षिण भागाला पाणीपुरवठा करणार्‍या नाहाटा चौफुलीवरील मेन रायझिंगला गळती लागल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सर्व्हिस रोड खोदण्याची परवानगी मिळाल्यानंतर पालिकेने गळती शोधण्याचे कार्य शुक्रवारी सुरू केल्यानंतर रविवारी तिसर्‍या दिवशी खोदकामानंतर महामार्गाच्या डक्टमध्ये जलवाहिनीला गळती असल्याचे समोर आल्यानंतर गळती दुरुस्त करण्यात आली. जीर्ण पाईप लाईनच्या तीन लेअरपर्यंत वेल्डिंग करण्यात आली असून मंगळवारी पालिकेतर्फे लिकेज दुरुस्तीचे चाचणी घेण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा

Leakage pipe line will be tested in Bhusawal today

अभियंता दीपक चौधरी यांनी सांगितले.


तीन दिवसानंतर गळतीचा लागला शोध
पालिकेने लिकेज दुरुस्तीसाठी महामार्गाच्या दक्षिणेकडील सर्व्हिस रोड फोडला. त्यातून महामार्गाच्या डक्टमधील पाईप बाहेर काढले. डक्टच्या आतील भागात गळतीचा शोध लागल्याने आता जोडणीचे काम पालिकेने सुरू केल्यानंतर तीन लेअरपर्यंत वेल्डिंग करण्यात आली आहे. बुधवारी चाचणी यशस्वी झाल्यानंतर या भागात पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा होणार आहे मात्र आतमध्ये आणखी जीर्ण पाईप लाईन निघाल्यास पुन्हा पाणीपुरवठा लांबण्याची चिन्हे आहेत. या जोडणीसाठी सर्व्हिस रोड खोदताना तेथे पाईप लाईनला कव्हरिंग केले नसल्याचे आढळल्याने आता सिमेंटद्वारे पाईप लाईनला कव्हरींग केले जाणार आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !