नांदेड-गंगानगर एक्स्प्रेसला जादा एसी कोच लावणार
भुसावळ : रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नांदेड-गंगानगर एक्स्प्रेस या गाडीला एक अतिरीक्त वातानुकूलीत तृतीय श्रेणी कोच लावला जाणार आहे. अप नांदेड-श्रीगंगानगर (17623) एक्स्प्रेस या गाडीला गुरूवार, 13 फे्रबु्रवारीपासून एक एसी-3 डबा लावला जाणार आहे. तर डाऊन (17624) श्रीगंगानगर- नांदेड एक्स्प्रेस या गाडीला शनिवार, 15 पासून एक अतिरीक्त एसी -3 डबा जोडला जाणार आहे.


