अडावद पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीच्या 31 दुचाकी जप्त : पाच आरोपींना अटक
Great achievement of Adavad police : 31 stolen bikes seized : Five accused arrested अडावद : अडावद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पाच दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी जळगाव जिल्ह्यातून दोन तर मध्यप्रदेशातील सेंधवा भागातून तब्बल 29 दुचाकी चोरल्याची कबुली दिल्यानंतर या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींना 8 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून दोन आरोपींचा मध्यप्रदेश पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.
सापळ्यात दोघे अडकताच बिंग फुटले
अडावद गावातील मंदार मोहल्ला भागातून युनिकॉन दुचाकी (एम.एच.18 ए.व्ही.2997) चोरी गेली होली. याप्रकरणी 29 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपास सुरू असताना अडावद पोलिसांनी बसस्थानक भागातून दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील दुचाकीची कागदपत्रे विचारली. संशयितांना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी दुचाकी चोरीची असल्याची कबुली देत या कृत्यात अन्य तीन संशयितांचा सहभाग असल्याचे सांगितले. पोलिसांनी आकाश दंगल भील (रा.मंगरुळ, ता.चोपडा) व राहुल गुलाब मिल (रा.टहाकळी, ता.धरणगाव) यांना बोलते केल्यानंतर त्यांनी साथीदार समाधान वसंत भिल (रा.मराठे, ता.चोपडा), महेंद्र गौतम गवले (चामखेडा, ता. शहादा, जि.नंदुरबार), नारायण नाथाभाऊ भील (रा.काकडदा, ता.शहादा जि.नंदुरबार) हे सुद्धा चोरीच्या दुचाकी विक्री करीत असल्याचे सांगितल्याने त्यांनाही अटक करण्यात आली.


मध्यप्रदेशातून सर्वाधिक दुचाकींची चोरी
पाच आरोपींच्या ताब्यातून एक युनिकॉन, 13 सीडी डिलक्स, चार शाईन, सहा स्प्लेंडर, एक आपाची, एक आर वन फायु, एक बुलेट, दोन होंडा 125, एक सीबी झेड, एक सीटी 100 अशा एकूण 312 दुचाकी जप्त करण्यात आल्या. अडावदचे सहाय्यक निरीक्षक गणेश बुवा व सहकार्यांनी ही कारवाई केली. आरोपींनी सर्वाधिक दुचाकी मध्यप्रदेशातून केल्याने मध्यप्रदेश पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
