राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौर्याबाबत यावलला उद्या बैठक
यावल : मुक्ताईनगर येथील शेतकरी मेळाव्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते व खासदार शरद पवार हे जिल्हा दौर्यावर शनिवार, 15 रोजी येत असून त्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक शुक्रवारी दुपारी तीन वाजता शेतकरी संघ सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष, पदाधिकारी सदस्य व कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन यावल शहर, फैजपूर शहर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष मुकेश येवले यांनी केले आहे.


