हरणखेडला विवाहितेचा विनयभंगानंतर पतीस मारहाण : सात जणांविरुद्ध गुन्हा
बोदवड : तालुक्यातील हरणखेड येथे 10 रोजी विवाहितेचा संशयीत आरोपी सागर शालिग्राम हिवराळे याने विनयभंग केला तर पीडीतेच्या पतीने याबाबत जाब विचारल्यानंतर आरोपी सागर हिवराळे, शालिग्राम हिवराळे, शुभम शालिग्राम हिवराळे, काशीनाथ शांताराम हिवराळे, सीताराम तुळशीराम हिवराळे, नंदाबाई शालिग्राम हिवराळे, गोपाळ शालिग्राम हिवराळे यांनी त्यांना मारहाण करीत शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तपास हवालदार संजय भोसले करीत आहेत.


