एरंडोल प्रांताधिकार्यांना ठार मारण्याचा प्रयत्न : पाचोर्यातील तिघा वाळू माफियांना बेड्या
Attempt to kill Arandol provincial officials : Three sand mafias in Pachora chained जळगाव : एरंडोलचे प्रांताधिकारी व त्यांच्या सहकार्यांवर वाळू माफियांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला होता शिवाय वाळू माफियांनी एरंडोल प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचा गळा आवळण्याचा प्रयत् करीत महसूल पथकावर हल्ला करीत त्यांच्यावर दगडफेक केल्याची बाब शुक्रवार, 12 जानेवारी रोजी रात्री घडल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी सहा दिवसानंतर तीन वाळू माफियांना पकडण्यात जळगाव एलसीबीला यश आले आहे. आकाश राजेंद्र पाटील (26), अमोल अरुण चौधरी (32), दादाभाऊ महादु गाडेकर (36, सर्व रा.पाचोरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पथकाला हुज्जत घालत निर्माण केला अडथळा
एरंडोल तालुक्यातील उत्राण अ.ह.शिवारातील गिरणा नदीच्या पात्रात प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड हे आपल्या महसूल पथकासह शुक्रवार, 12 रोजी रात्री अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेल्यानंतर ख्वाजा मिया दर्ग्याजवळ वाळू माफियांनी पथकावर हल्ला चढवत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. संशयितांनी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना खाली पाडून त्यांना गळा दाबून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला तर महसूल पथकाने संशयितांना बाजूला सारत प्रांताधिकार्यांची सुटका केली. आरोपींपासून जीव वाचवण्यासाठी पथक नदीच्या बाहेर जीव मुठीत घेवून पळत असताना वाळू माफियांनी जोरदार दगडफेक केली. संशयितांनी त्यानंतर दोन ट्रॅक्टर नदीतून पळवून नेले होते.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, महेश महाजन, विजय पाटील, रणजीत पाटील, महिला अश्विनी सावकारे आदींनी आरोपींना अटक केली. संशयितांना कासोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.