हाडाखेडजवळ लक्झरीतून अडीच लाखांचा गांजा जप्त


शिरपूर : तालुक्यातील हाडाखेड गावाचे शिवारात शिरपूरकडून येणार्‍या राष्टीय महामार्ग क्रमांक तीनवर विनाय हॉटेलबाहेर शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास लक्झरी (क्रमांक आर जे. 30 पी.बी.0999) मधून दोन लाख 51 हजार 360 रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी यमुना शरीफ अंभगे (25, रा.महाराणा चौक, कंजरवाडा, नंदुरबार), कोमल दीपक गागडे (22, महाराणा चौक, कंजरवाडा, नंदुरबार ह.मु. पोपटी कॉलनी सिध्दार्थ नगर, ठाणे ईस्ट, जि.ठाणे), कुलता संजय बाडुंगे (28, महाराणा चौक, कंजरवाडा, नंदुरबार) यांना अटक करण्यात आली. आरोपींविरुद्ध कैलास माणिक पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक राजु भुजबळ व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभिषेक पाटील, नियाज शेख, कैलास पाटील, संजय देवरे, संजीव जाधव, आरीफ पठाण, राजीव गीते, अश्विनी चौधरी, सुनीत पवार आदींनी ही कारवाई केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !