श्री क्षेत्र मेहुणला महाशिवरात्री महोत्सव


भुसावळ : मुक्ताईनगर तालुक्यातील श्री क्षेत्र मेहुण येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही मंगळवार, 18 ते शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 दरम्यान माघ महाशिवरात्री महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. माघ महाशिवरात्री महोत्सवासाठी महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून तसेच आजुबाजूच्या राज्यातील दिंड्यांचे आगमन मंगळवार, ि18 रोजी दुपारी 12 वाजेपासून होणार आहे. बुधवार, 19 रोजी भागवत एकादशीपासून दररोज सकाळी सातवाजेपासून प्रत्येक दिंडीतील दिंडीचालक महाराजांचे कीर्तन तसेच प्रवचनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी पाच वाजता दिंडी प्रदक्षिणा सोहळा प्रारंभ होऊन त्यात येथे आलेल्या सर्वच दिंड्या सहभागी होणार आहे.

भाविकांची राहणार अलोट गर्दी
ज्ञानोबा माऊली तुकाराम, मुक्ताई शरणम् मुक्ताई शरणम्, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम अशा जयघोष गजरात दिंडी पावल्या टाकत, भजने म्हणत प्रदक्षिणा पूर्ण करणार आहेत. दरवर्षाप्रमाणे यंदाही भाविकांची अलोट गर्दी याठिकाणी उलटणार असल्याने मुक्ताईनगर व सावदा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. हा उत्सव 22 फेब्रुवारी 2020 पर्यंत चालणार असून 22 रोजी काल्याच्या कीर्तनाने उत्सवाचा समारोप होईल. दरम्यान, श्री क्षेत्र मेहुण ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथे श्री संत आदिशक्ती मुक्ताई यांची पायी दिंडी पालखी श्री संत निवृत्तीनाथ समाधी सोहळ्यानिमित्त गेली होती. ही पायी दिंडी पालखी मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास श्री क्षेत्र मेहुण तापी तीर येथे परतणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !