भरधाव कारची अ‍ॅपे रीक्षाला धडक : चालकासह सहा प्रवासी जखमी


यावल : अंकलेश्वर- बर्‍हाणपूर मार्गावर चोपडा रस्त्यावरील वढोदा गावाजवळ भरधाव वेगात येणार्‍या कारने अ‍ॅपेला दिलेल्या धडकेत सहा जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला. चोपड्याकडून यावलकडे अ‍ॅपे (क्रमांक एम. एच. 19 बी.जे. 4665) येत असताना पाठीमागून आलेली कार )जी. जे. 05 सी.के.4599) ने धडक दिल्याने अ‍ॅपे प्रवाशांसह थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या रसवंतीच्या शेडमध्ये घुसली. या अपघातात राजू भगवान सोळुंके (42), कल्पना राजू साळुंके वय 35 दोघं रा. किनगाव, तसेच जायदाबानू शेख आसीफ (40), शिवदास यादव (65), शेख आसीफ शेख इसामुद्दीन (65) व अ‍ॅपे चालक शेख फारुख शेख आसीफ (सर्व रा. रावेर) हे जखमी झाले. यातील राजू साळुंखे व शेख आसीफ यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. या सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालयात डॉ. विनेश पावरा, प्रियंका मगरे आदींनी प्रथमोपचार करीत जळगावात हलवले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !