कायदा टांगला वेशीवर : गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिस ठाण्याबाहेर बोकडाचा बळी


Law hanged at the gate: Buck killed outside police station to curb serious crime rate उदगीर : उदगीर पोलिस ठाणे हद्दीत वाढणारे गुन्हे रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी चक्क बोकडाचा बळी दिल्याा प्रकार उघडकीस आल्यानंत राज्यात खळबळ उडाली आहे. जादूटोणा, अंधश्रद्धा विरोधी कायद्यानुसार गुन्हा असताना पोलिसांनी त्याचे उल्लंघण केल्याने पोलिस दलावर टिकेची झोड उठली आहे.

बोकड कापून केली बिर्याणी
एका अधिकार्‍याने या पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारून वर्ष झाले, तरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात व गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होत नव्हते. त्यावर उपाय म्हणून बोकडाचा बळी देण्याची भन्नाट कल्पना अधिकार्‍याला सुचली. वरीष्ठ अधिकार्‍याने क्रमांक तीनच्या अधिकार्‍यांवर बोकड आणून बळी देण्याची जबाबदारी सोपवली. एका अधिकार्‍याने बोकड आणि कसायाला पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्याच्या आवारात बोकड कापण्यात आला व नंतर त्याची बिर्याणी करण्यात आली.



दोषीेंवर गुन्हा दाखल करा : अंनिस
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यावर आक्षेप घेतला असून कारवाईची मागणी केली आहे. जादूटोणा, अंधश्रद्धा कायद्यानुसार गुन्हा असताना पोलिसच असे करीत असतील तर सर्वसामान्यांमध्ये अंधश्रद्धेविरोधात जागृती कशी करणार, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. अशा अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंनिसचे कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी केली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !