विचार आणि भूमिकेशी ठाम ; धमक्यांना घाबरणार नाही : छगन भुजबळ
Be firm in thinking and standing; Will not be afraid of threats : Chhagan Bhujbal नाशिक : आपल्या विचार आणि भूमिकेशी ठाम असूनए असे किती धमकी पत्र आले तरी मागे हटणार नाही, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना अज्ञात व्यक्तींनी पत्र पाठवून त्यांना जीवे कट रचण्यात असल्याची माहिती दिली होती. 50 लाख रुपयांची सुपारी पाच व्यक्तींनी घेतली असल्याची माहिती या पत्राद्वारे देण्यात आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
यापूर्वीही अनेकदा आल्या धमक्या
नाशिकमध्ये शनिवारी माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, आपल्याला धमकीचे पत्र आणि मेसेज यापूर्वी अनेकदा आलेले आहेत मात्र काल झालेल्या पत्रात अनेक प्रकारचा तपशील देण्यात आला आहे. सदरचे पत्र हे पोलिसांना देण्यात आले असून ते संबंधित व्यक्तींचा शोध घेतील आणि योग्य ती कारवाई करतील. आपण एका विचाराने काम करत असून त्यानुसार यापुढेही काम करू अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरणार नाही, असेही ते म्हणाले.


भूजबळांना पत्राद्वारे दिला सतर्कतेचा इशारा
भुजबळ यांना पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये सागर हॉटेलसमोर एक बैठक घेण्यात आली. त्यात भुजबळ यांना मारण्यासाठी 50 लाख रुपयांची सुपारी पाच संशयितांनी घेतली आहे. संशयित भुजबळ यांचा शोध घेत आहेत त्यामुळे सावध रहावे, असे पत्रात नमूद आहे. नाशिकच्या अंबड पोलिसांनी दोन अधिकारी आणि 20 कर्मचारी असा बंदोबस्त नाशिकच्या भुजबळ फार्म जवळ वाढवल्याचे सांगण्यात आले.






