भुसावळातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात गणरायाला निरोप


भुसावळ (बुधवार, 16 सप्टेंबर 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात तीन दिवसीय उत्सवानिमित्त गणरायाला निरोप देण्यात आला. महाविद्यालयात गणेशमूर्तीची विधिवत पूजा, आरती व विविध धार्मिक उपक्रमानंतर भक्तिभावाने श्रींचे विसर्जन करण्यात आले.

भक्तीमय वातावरणात बाप्पांना निरोप
प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत श्री गणरायाची आरती करण्यात आली. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित राहून या सोहळ्यात सहभागी झाले. तीन दिवसांच्या गणेशोत्सव काळात महाविद्यालय परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.. सकाळ-संध्याकाळ श्री गणरायाची आरती करण्यात आली. गणेशभक्तांनी मोठ्या श्रद्धेने आरतीमध्ये सहभाग घेतला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.




यावेळी महाविद्यालयातील कार्यालयीन अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एकोपा, श्रद्धा, संस्कृती आणि पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश देत तीन दिवसीय गणेशोत्सवाची सांगता झाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !