भुसावळात पोलिस उपअधीक्षकांच्या सतर्कतेने वाचले तरुणाचे प्राण : त्रिकूटाला बेड्या


Vigilance of the Deputy Superintendent of Police saved the life of a young man in Bhusawal : Trikoota in shackles भुसावळ : तरुणीला पळवून नेण्यास सहाय्य केल्याच्या संशयातून तरुणाच्या नातेवाईकावर प्राणघातक हल्ला करण्याच्या प्रयत्नात संशयित असतानाच भुसावळचे सतर्क पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी धावत्या वाहनातून उडी घेत संशयितांना दूर लोटल्याने तरुणाचे प्राण वाचले. या हल्ल्याप्रकरणी सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्रिकूटाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. भुसावळातील जामनेर रोडवर शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली.

पोलिस उपअधीक्षकांची सतर्कता
जामनेर रोडवरील डॉ.स्वप्नील कोळंबे यांच्या दवाखान्यासमोर सुमारे सात जणांचे टोळके हे एकाला बेदम मारहाण करीत होते व एकाने मोठी फरशी उचलून तरुणाच्या डोक्यात टाकणार तोच जेवणासाठी वाहनातून घराकडे निघालेल्या पोलिस उपअधीक्षक कृष्णात इंगळे यांच्या लक्षात ही बाब आली व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता धावत्या वाहनातूनच उडी घेत संशयितांना धक्का दिल्याने अप्रिय घटना टळली..



तरुणीला पळवण्यास मदत केल्याच्या संशयातून हल्ला
शनिवारी दुपारी शहरातील जामनेर रोडवरील डॉ.स्वप्नील कोळंबे यांच्या हॉस्पीटलवरील गारखेडा येथील युवक अकाश राजेश बेलदार (मोहिते) हा त्याच्या मित्रासह मोटर सायकलने जात असतांना त्याला 7 ते 8 जणांनी अडवून थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. आकाश याला सर्व हल्लेखोर मिळून फायटर, बुक्यांनी मारहाण करीत होते. यामुळे आकाश याच्या तोंडालाा, गालास, डोळ्याजवळ, जबर मार लागला. यात तो जखमी झाला व सोबतचा सहकारी याला डोक्याला मार लागला. रस्त्यावर सुरू असलेली फ्रिस्टाईल अनेक जण पाहत होते मात्र सोडविण्यास कोणीही येत नव्हते. याच वेळी डीवायएसपी कृष्णात पिंगळे हे कार्यालयातून घरी जेवणास जात होते. त्यांनी हाणामारी पाहताच क्षणाचाही विलंब न करता संशयितांच्या हातातील फरशी हिसकावत त्यांना दूर लोटले.

जखमी सुध्दा पसार
डीवायएसपी पिंगळे हे घटनास्थळी धावत जात असल्याने हल्लेखोरांसोबत जखमी सुध्दा पसार झाला. यावेळी डीवायएसपी पिंगळे यांनी तत्काळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात माहिती देऊन डीबी पथक व पोलिस अधिकारी यांना घटनास्थळी बोलावले. जखमी आकाश याचा पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांना तो ट्रामा केअर सेंटर येथे मिळून आला. पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश जाधव, विजय नेरकर, उमाकांत पाटील, प्रदीप पाटील, यासीन पिंजारी यांनी जखमीचा जबाब नोंदविला. याप्रकरणी सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्रिकूटाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !