भुसावळ भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची कार्यकारीणी जाहीर
Bhusawal BJP Scheduled Caste Morcha executive announced भुसावळ : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष राहुल वसंत तायडे यांनी नूतन कार्यकारीणी जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्य भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष दिलीप कांबळे, जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, खासदार रक्षा खडसे, भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे, भाजपा भुसावळ शहराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष राहुल वसंत तायडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
असे आहे पदाधिकारी
शहर सरचिटणीस- संतोष ठोकळ व रवींद्र दाभाडे तर शहर उपाध्यक्ष- दीपक सोनवणे, प्रेमचंद तायडे (अल्बर्ट), संजय चव्हाण, विक्की गोहर, अश्विन नरवाडे, रवींद्रनाथ खरात, नरेश खंडारे, दिनेश बालूरे, शंकर कांबळे, राकेश सपकाळे, रवींद्र घुले, शहर चिटणीस भरत उमरीया, संजय नरवाडे, मुकेश कांबळे, आकाश आव्हाड, कमलाकर अडकमोल, गणेश रणशिंगे. नवनियुक्त पदाधिकार्यांचे भाजपा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व्यापारी आघाडी प्रकोष्ठ मनोज बियाणी, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन, अशोक कांडेलकर, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नागेश्वर सावळे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रशांत निकम आदींनी अभिनंदन केले आहे.








