भुसावळातील श्री स्वामीनारायण गुरुकुलमध्ये शिक्षापत्री ग्रंथाचे सामूहिक पठण
भुसावळ : सुमारे 198 वर्षांपूर्वी भगवान स्वामीनारायण यांनी मानवधर्म कसा असावा, जीवन जगतांना कोणती पथ्ये पाळावीत याच्या मार्गदर्शनासाठी लिहिलेल्या शिक्षापत्री ग्रंथाच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथील श्री स्वामीनारायण गुरुकुलातील 500 युवक-युवती यांनी शिक्षापत्री ग्रंथाचे सामूहिक वाचन केले, गुजरातमधील वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिरातील वक्ताश्री ईश्वरस्वरुपदास शास्त्री यांनी पठण केले.
यावेळी अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष गुजरात राज्यातील वासद मंदिराचे के.के.शास्त्री होते. यावेळी शिक्षापत्री पठणासाठी सातोद, कोळवद, डोंगर कठोरे, आमोदा, बामनोद, सांगवी येथील 500 युवक-युवती उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वासद, गुजराथ येथून विष्णुप्रसाद स्वामी, राधास्वामी, घनश्याम स्वामी, जळगावचे नयनप्रकाश शास्त्री, गोविंद प्रकाश स्वामी, सावदा गुरुकुलचे भक्तिकिशोर शास्त्री, भुसावळ मंदीराचे धनप्रसादशास्त्री व इतर संतगण तसेच परीसरातील नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन स्वामीनारायण गुरुकुलचे सचिव ऋषीप्रसाद स्वामी यांनी केले.








