पूलवामा हल्ल्यातील शहिदांना भुसावळात आदरांजली


Tribute to martyrs of Poolwama attack in Bhusawal भुसावळ : राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल व जामनेर रोडवरील बियाणी मिलीटरी स्कूलमध्ये पूलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यांची होती उपस्थिती
जामनेर रोडवरील बियाणी स्कूलमध्ये इंग्रजी व मराठी माध्यम शाळेत पूलवामा हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय शिक्षा समितीचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी, किरण कोलते, गोपाळ ठाकूर, शाळेचे मुख्याध्यापक रुद्रसेन गंठिया आदी मान्यवर उपस्थित होते. पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून शहिद जवानांप्रति आदरांजली व्यक्त केली. पुलवामा हल्ल्याचे भीषण कथन आर.आर.बोरसे यांनी अंगावर शहारे आणणार्‍या भाषेत केले. आभार रुद्रसेन गंठिया यांनी मानले.



बियाणी मिलिटरी स्कूल
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील आतंकवादी हल्ल्यात शहिद झालेल्या केंद्रीय राखीव दलातील जवानांना बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम शहिद जवानांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. सैनिकी गणवेशात असलेल्या शाळेच्या 900 विद्यार्थी विद्यार्थिनींनी शहिद जवानांना सलामी दिली. शाळेचे सैनिकी प्रशिक्षक आर.आर.बोरसे यांनी आपल्या सैनिकांवर पुलवामा आतंकी हमला कसा झाला ? याबाबतची माहिती दिली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी, कार्यकारी संचालक रोनक बियाणी, आयुषी रोनक बियाणी, युको बँक झोनल ऑफिसर राजन (नागपूर), युको बँकेचे मॅनेजर शैलेश गुप्ता, माजी नगरसेवक निर्मल कोठारी, सोनू (महेंद्र) मांडे, राजीव पारीख, प्रवीण भराडीया, गोटू लाहोटी, बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !