भुसावळ मद्यपी वाहन चालक पोलिसांच्या रडारवर : दोघांविरोधात गुन्हे ; वाहनधारक धास्तावले
Bhusawal drunk drivers on police radar : Crimes against both ; Motorists panicked भुसावळ : मद्याच्या नशेत वाहन चालवणार्या दोन वाहन धारकांविरोधात भुसावळ शहर वाहतूक शाखेने गुन्हे दाखल केल्याने वाहन धारकांच्या गोटात खळबळ उडाली आहे. शहर वाहतूक शाखेने मद्यपी वाहनधारकांविरोधात मोहिम उघडली असून मद्य प्राशन करून वाहन चालवणार्या वाहन धारकांविरोधात थेट गुन्हे दाखल केले जात असल्याने वाहनधारक हादरले आहेत.
दोन वाहनधारकांविरोधात गुन्हे
26 रोजी सायंकाळी सहा वाजता मद्य प्राशन करीत दुचाकीस्वार आनंदा संभाजी चौधरी (64, अयोध्या नगर, भुसावळ) हे दुचाकी (एम.एच.19 ए.एम.5839) चालवत असताना शहर वाहतूक शाखेचे कॉन्स्टेबल संजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. दुसरी कारवाई शहर वाहतूक शाखेचे प्रशांत दिनकर चव्हाण यांनी करीत दुचाकीस्वार नरेश प्रकाश बाविस्कर (22, अयोध्या नगर, बुलेट शोरूम मागे, भुसावळ) यांच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. संशयित दारूच्या नशेत रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करीत वाहन चालवताना आढळल्याने तक्रार नोंदवण्यात आली. तपास हवालदार विजय पाटील व हवालदार अजय पाटील करीत आहेत.

