वंचित शेतकर्‍यांनाही मिळावा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ : अमोल जावळे


Underprivileged farmers should also get the benefit of Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Loan Waiver Scheme: Amol Jawle भुसावळ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांचा योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सत्ताबदल होताच शेतकरी उपेक्षित
राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने
‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना’ राबवली होती. या योजनेत पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असतांनाच राज्यात सत्ता बदल होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले व त्यांनी नवीन ‘महात्मा फुले शेतकरी कर्ज योजना’ राबवून कर्जमाफीसाठी पात्र ठरवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेतील शेतकर्‍यांना या योजनेत सामावून न घेता त्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील तब्बल 19 हजार शेतकरी व राज्यभरातील दोन लाख 75 हजार शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले आहेत.




तर राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा
राज्यात 2007 पासून एकदाही कर्ज माफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी शेतकरी बांधवांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी केल्यास जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांचा याचा फायदा होईल शेतकरी बांधवांच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याचे निवेदनात अमोल हरिभाऊ जावळे यांनी म्हटले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !