ज्या कामांचा निधीच आला नाही तर अपहार कसा ? अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी

खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा व बदनामीसाठी नेत्यांनी रचले षडयंत्र रचल्याचा माजी आमदारांचा दावा


अमळनेर (शनिवार, 25 जुलै 2026) : विकासकामांसाठी निधीच आलेला नाही त्यामुळे अपहार कसा झाला? आपल्याला बदनाम करण्यासाठी नेत्यांनी खोटे षडयंत्र रचले व दवावातून आपल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी येथे केला. अलीकडेच माजी आमदार चौधरी यांच्यासह इतरांविरोधात नंदुरबार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणावर त्यांनी प्रकाश टाकला.

काय म्हणाले माजी आमदार ?
माजी आमदार चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, नंदुरबार येथे खोटे लेटर पॅड व निधीच्या अपहाराचा दाखल झालेला गुन्हा खोटा आहे शिवाय हा प्रकार स्थानिक राजकारणातून घडल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मी मंत्रालयात कामासाठी लेटर पॅड द्यायलाच गेलो नाही आणि ज्या कामाचा निधीच आला नाही तर अपहार कसा होईल ? असा प्रश्न उपस्थित करून शिरीष चौधरींनी घटनेवर प्रकाश टाकला. मी भाजपमध्ये असताना माझ्यासोबत काही नगरसेवक भाजपमध्ये होते. त्यावेळी विजय गावित यांनी निधीसाठी पत्र दिले होते नंतर ते नगरसेवक शिवसेनेत आले आणि कामासाठी मंत्रालयात आलो असताना मी काम रद्द होऊ नये म्हणून डेस्क ऑफिसरला काम मार्गी लावायला सांगितले मात्र आमदार अनिल पाटील पत्रकाराना सांगतात की, शिरीष चौधरींनी नऊ कोटी स्वतःसाठी वापरले जर निधीच आला नाही आणि आला तो पालिकेला येईल मग अपहार होईल कसा? मला बदनाम करण्यासाठी स्थानिक भाजप नेते काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

अमळनेरच्या गुन्ह्याबाबत ही आरोप
आमदार अनिल पाटील खोटे बोलतात त्यांनी निवडून आल्यावर अवैध धंदे आणि वाळू विषयी वल्गना केल्या मात्र त्यांनीच ठेका घेतला. ती वाळू क्रशरवर दाबली आहे. 22 रोजी झालेल्या प्रकाराबाबत ते म्हणाले की, गट नंबर 83 मध्ये खाण पट्टा मंजूर नव्हता तेथे मुरूम चोरला आणि इटीएस अधिकारी मोजणी करायला आले आणि तेथे काही लोकांनी गोंधळ घातला. सामाजिक कार्यकर्त्याला हाकलून लावले. मी पोलीस अधीक्षकांना फोन केला पोलीस आले मग पोलिसांसमोर हाणामारी झाली तर पोलिसानी एकतर्फी गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला. अमळनेर येथील गुन्हे पोलिसांनी मागे घ्यावेत आणि सखोल चौकशी करावी, अशीही मागणी केली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !