वरणगाव पोलिसांची मोठी कारवाई : दोन लाख 68 हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त


Major action by Varangaon police:  Banned gutkha worth ₹2.68 lakh seized वरणगाव (शनिवार, 25 जुलै 2026) : राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची वाहनातून वाहतूक होणार असल्याची माहिती वरणगाव पोलिसांनी मिळाल्यानंतर सापळा रचून एका वाहनातून दोन लाख 68 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. गुटखा, पान मसाला आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांसह वाहन मिळून एकूण पाच लाख पाच लाख 17 हजार 868 रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि वाहतुकीसाठी वापरलेले इनोव्हा वाहन जप्त करण्यात आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
वरणगावचे सहाय्यक निरीक्षक अमितकुमार बागुल यांना एका वाहनातून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या निर्देशानुसार पथकाने शुक्रवार, 24 जुलै 2026 रोजी रात्री सापळा रचल्यानंतर 8.20 वाजेच्या सुमारास संशयीत इनोव्हा वाहन (एम.एच.20 बी.डी.3000) आल्यानंतर तिची पंचांसमक्ष झडती घेतल्यानंतर त्यात राज्यात प्रतिबंधीत असलेला पानमसाला व तंबाबू जप्त करण्यात आली. या प्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी योगराज सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक चेतन लक्ष्मण नारखेडे (28, रा. नशिराबाद, जि. जळगाव) विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक एम.के.बेंडकोळी करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !